दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंद्रायणी नदी पूजन कार्यक्रमात आळंदी देवस्थानला भक्त निवास बांधकामासाठी २५ कोटी निधीची घोषणा करण्यात आली होती. महीना भराच्या आतच आळंदी देवस्थानच्या भक्त निवास बांधकामासाठी १० कोटीचा अध्यादेश जारी करण्यात आले असल्याचे आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुध्दा उपस्थित होते. बैठक संपल्यावर आळंदी देवस्थानच्या भक्त निवास बांधकामासाठी १० कोटीचा अध्यादेश उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर व व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थितीत होते.



