शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर व बफर क्षेत्रात दिनांक १२ मे २०२५ रोजी बुद्ध पौर्णिमेला “निसर्गानुभव” कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
याकरीता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या https://mytadoba.mahaforest. gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.
सदर कार्यक्रमामध्ये कोर क्षेत्रात ९६ मचानावर व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी व बफर क्षेत्रात ८१ मचानावर १६२ निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला.
या व्याघ्र प्रकल्पातील कोर विभागात मोहर्ली,ताडोबा,कोळसा,कोलारा व कारवा असे एकूण ५ वनपरिक्षेत्र तसेच बफर विभागात पळसगाव चंद्रपूर, मूल,शिवणी,खडसंगी व मोहर्ली असे एकूण ६ वनपरिक्षेत्र आहेत.
त्यानुसार सदर कार्यक्रमामध्ये निसर्गप्रेमींनी विहीत प्रपत्रात नमूद केलेल्या प्राण्यांच्या संख्या खालीलप्रमाणे आहे :-
अ.क्र.
प्राण्याची प्रजाती,कोर विभाग,(कोर व बफर) एकूण..
अ. क्र.
बफर विभाग,प्राण्याची प्रजाती,कोर विभाग,बफर विभाग,(कोर व बफर) एकूण
१),वाघ ३९,२४,६३,१४…,२) मोर ४५०,१०१,५५१,२..,३) बिबट ९,४,१३,१५…,४) रानकोंबडा ५३,५३,३..५) अस्वल ५०,४३,९३,१६..६) ससा १४,0,१४,४..७) रानकुत्रा ८६,१०,९६,१७…८) सायाळ २३,४,२७,५…९) मुंगूस ६२,३८,१००,१८,…१०)चिंकारा 0,१३,१३,६…११) रानमांजर ४,३,७,१९…१२) तडस १,१,७…१३) चौशिंगा ७,२०,२७,२०..१४) उडती खार ४,0,५,८…१५) माकड ५३४,३२३,८५७,२१…१६) उदमांजर ४६,४,५०,९…१७) सांबर ३८५,१६८,५५३,२२…१८) जवादी मांजर १४,१५,२९,१०…१९) रानगवा ३००,२८२,५८२,२३…२०) मगर ६,0,६,११…१९) रानडुक्कर २७२,१०९,३८१,२४…२१) चांदी अस्वल ३,१२…२२) चितळ १२४९,४८८,१७३७,२५…२३)भेडकी ८६,१२,९८,१३…२४) नीलगाय २४,६३,८७,२६…२५) ईतर २४,३२,५६,असे एकूण सर्व प्राणी संख्येमध्ये ३७४६,१७५६,५५०२,आहेत…
या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पर्यावरण जागृती,जैवविविधतेची जाणीव व वन्यजीव संवर्धनाबाबत जनसामान्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून,भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम वनविभागामार्फत सातत्याने राबविण्यात येतील असे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्न प्रकल्प चंद्रपर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


