सुशिक्षित युवापिढीनो स्वतःच्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीला प्रश्न विचारा…
“तुम्ही या देशाचे आजचे आणि उद्याचे आधारस्तंभ आहात.””स्वतःचे भविष्य घडविण्याच्या धडपडीबरोबरच…
ही धडपड आणि हा तुमच्या समोर आवासून उभा असलेला जीवनसंघर्ष यांची निर्मिती का आणि कुणी केली याचा शोध तुम्ही कधी घेणार?
“यासाठी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्यासमोर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेने निर्माण केलेल्या संभ्रम आणि वैचारिक गोंधळातून बाहेर पडा….
याच मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मानसिक गुलामीतून बाहेर पडून सदविचारी बनण्यासाठीच त्याचा वापर करा….
आज आपल्या देशाकडे,जगाकडे पहा….
आपला देश आणि जग 75 वर्षांपूर्वी कसे होते,आणि आज कसे आहे?
याचा विचार करा…
तुम्हाला लाखो रुपये पगाराच्या नोकऱ्या मिळतही असतील….
भौतिक सुखाने प्रचंड भरभराटही होत असेल…
मोबाईल इंटरनेट मुळे जग तुमच्या मुठीतही असेल….
परंतु , तुम्हाला तुमच्या घराच्या,दवाखान्याच्या,गाडीच्या इत्यादी सर्व प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी लाखो रुपये पगारी दोघा पती पत्नीला असतानाही बँकेच्या कर्जावरच का अवलंबून राहावे लागते?याला आर्थिक विकास म्हणत नाहीत!
तुम्ही जर कर्जाळू होत असाल तर देश आणि जग सुद्धा कर्जाळू नाही कशावरून?
असे असेल तर हे असं का घडत असेल?याचा विचार तुम्ही कधीतरी करणार की नाही……
गेल्या 75 वर्षांपासून तुम्ही हा विचार कधी केलाच नाही. व्यवस्थेने लादलेल्या प्रवाहात तुम्ही वाहत जाण्यास तयार असता.म्हणून तुम्हाला तसे मानसिक गुलाम बनविण्यासाठी येथील व्यवस्था नेहमी तत्पर असते.हे निदान तुम्ही तरी जाणून घ्या.
एक तर बोटावर मोजण्या इतक्या टक्केवारीनुसारच सुशिक्षितांच्या बेरोजगारीच्या समस्या सुटल्या आहेत.परंतु , बहुमताचा विचार जर केला तर 75 % सुशिक्षित बेकारांचा लोंढा आजही वरचेवर वाढतो आहे!
केवळ बेकरीचाच प्रश्न नाही,तर सुसंस्कृतपणाचाही प्रश्न आहेच.तुम्ही सदविचारी बनूच नये…….
सदविचारी बनून संघटीतपणे व्यवस्थेला जाब विचारू नये…..
यासाठी येथील राजकारण्यांनी,तुम्हाला मानसिक गुलाम बनवले.आणि तुम्ही बनलात!
या देशातील स्वातंत्र्य विरांनी तुमच्याच भविष्यासाठी अर्थात देशासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले.फासावर चढले……
तुमचे अर्थात देशाचे स्वातंत्र्य कधीही कुणीही हिरावून घेऊ नये,यासाठी तत्कालीन नेत्यांनी आणि महापुरुषांनी एकत्र येऊन हजारो वर्षाच्या दूरदृष्टीने विचार करून या देशाचे भवितव्य,भारताच्या संविधानातून घडविले…..
परंतु ,त्याच संविधानाला संपविण्यासाठी आणि तुम्हाला पुन्हा देशांतर्गत मानसिक गुलामी आणण्यासाठी येथील संविधानविरोधी शक्ती अर्थात RSS गेल्या 75 वर्षांपासून प्रयत्न करत आहे.आणि गेल्या 75 वर्षात तीने सुरुवातीला गोगलगायीची, त्यानंतर कासवाची,2014 पासून सशाची,आता 2024 पासून प्रकाशवर्षाची गती घेतली आहे!
— ही सर्व प्रकारची गती हाणून पाडायची असेल…
— तुमचेच भविष्य उज्वल घडवायचे असेल…
— देशाचे भविष्य उज्वल करायचे असेल…
तर,वरील प्रकारचे प्रश्न स्वतःला विचारा….
त्यासाठी संविधानातून या प्रश्नांची उत्तरे शोधा.ती निश्चितच सापडतील. तेंव्हाच या संविधानविरोधी शक्तीला कायमचे पराभूत करण्यासाठी…….
आणि आपल्या मूलभूत मताच्या अधिकाराचे हणन करणाऱ्या EVM ला कायमचे हटविण्यासाठी…….
आपल्या हृदयाला आणि मनाला तयार करा,हाच एकमेव मार्ग आहे….
अन्यथा……..
उद्याचा विचार न करता स्वतःचे आणि परिवाराचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहत आजच मरा….
आवाहनकर्ता
जागृतीचा कृतिशील लेखक…
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…



