Home Social नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी…

नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

     चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव (पि) येथील नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली.

      विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेंला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

     पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष कैलास खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले.

      कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव संजय जुमळे,ग्रामपंचायत पळसगांवच्या सरपंच सरीताताई गुरुनुले,पळसगांवचे उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,पळसगांव पोलीस पाटिल रागिनाताई दडमल,गावातील प्रतिष्ठित नागरिक संपत येसनसुरे,महामाया महिला मंडळ चे अध्यक्षा जयवंता रामटेके हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

       महामाया महिला मंडळचे सचिव लता खोब्रागडे,शामराव रामटेके,उपासक-उपासिका यांची कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती होती.