शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकातंर्गत भिसी जवळील 3 किलोमीटर असलेल्या नवेगाव( ब्राम्हण) येथे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केले.तद्वतच अभिवादन केले.
याप्रसंगी रंजना ढोक,जिजाबाई पाटील,वैशाली बौद्ध,शिल्पा पाटील,कैलास बोरकर,गुरुदेव राऊत,प्रकाश बोरकर,प्रदीप पाटील,बाबा बौद्ध,धीरज पाटील,साहिल बोरकर,शुभम पाटील,दीक्षांत श्रीरामे आदी मान्यवर व बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता खीर दानाने करण्यात आली.



