Home देशविदेश खासदार डॉ.नामदेवराव किरसान मौजा नवतळा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर…. — सतर्क,जागरुक,संवेदनशील,संवेदनक्षम,कर्तव्यदक्ष खासदार...

खासदार डॉ.नामदेवराव किरसान मौजा नवतळा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर…. — सतर्क,जागरुक,संवेदनशील,संवेदनक्षम,कर्तव्यदक्ष खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मिळाले हेच लोकशाहीचे प्रत्यक्ष दर्शन!

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..

      गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान हे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यक्षम,तत्पर लोकप्रतिनिधी असून ते आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्यांच्या,महिलांच्या,नागरिकांच्या,विद्यार्थ्यांच्या,बेरोजगारांच्या समस्या जाणून घेत आहेत.

            असाच प्रसंग अनुभवायला आला तो चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नवतळा येथे.त्यांनी नवतळा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जात उन्हाळी हंगामातंर्गत धानपिकाची पहाणी केली आणि चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून महाराष्ट्र शासनाच्या कृषी व व्यवस्थापन विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

         चिमूर तालुक्यात हेव्याचे आणि निती पेक्षा कुटनितीचे राजकारण सुरू आहे.शेतकरी म्हणून किंवा समस्याग्रस्त/संकटग्रस्त शेतकरी,नागरिक म्हणून त्यांचेकडे न्याय तथा मदत भुमिकेतून बघितले जात नाही.

         यामुळे चिमूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांवर व नागरिकांवर अप्रत्यक्ष अन्याय शासन-प्रशासनाद्वारे केला जातो आहे हे निर्विवाद सत्य आहे.

           गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे तत्पर आणि जागरूक खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी मौजा नवतळा येथे शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून निवेदन स्वीकारले तसेच खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी अवकाळी-वादळी पावसामुळे व गारपीट मुळे धान पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली.

      तद्वतच अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे पंचनामे करून शासनाकडे नुकसान पंचनामा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यात.

         मतदारांच्या, शेतकऱ्यांच्या,बेरोजगारांच्या, विद्यार्थ्यांच्या,महिलांच्या हितासाठी सातत्याने धडपडणारे खासदार म्हणून डॉ.नामदेवराव किरसान यांची ओळख निर्माण झाली.

        गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना तत्पर,जागरुक,अभ्यासू,संवेदनशील,संवेदनक्षम,कर्तव्यदक्ष खासदार डॉ.नामदेवराव किरसान मिळाले हेच लोकशाहीचे प्रत्यक्ष मुल्य व दर्शन आहे,हे समजून घेतले पाहिजे.

       यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमुर डॉ.विजय पाटील गावंडे,काँग्रेस कमिटीचे चिमूर तालुका सचिव विजयभाऊ डांबरे,सरपंच पुंडलिक मेश्राम,उपसरपंच तुळशीदास शिवरकर,डॉ.मधुकर शिवरकर,विनोद वसाले,भास्कर रामटेके,धनराज डायरे,शुभम पारखी,रोशन मासुरकर,रामचंद्र निकुरे,आदी पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.