Home Social “जगाला युध्द नाही बुध्द हवा,च्या जयघोष ने निनादला मालेवाडा…

“जगाला युध्द नाही बुध्द हवा,च्या जयघोष ने निनादला मालेवाडा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

      चिमूर तालुकातंर्गत मौजा मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

     कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध,बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.

        यावेळी विहारापासून ते गावातील मुख्य रस्त्याने तथागतच्या बुद्ध मूर्तीसह जयघोष करत,हातात मेणबत्ती पकडून शांततामय मिरवणूक सुगतकुटी कडे मार्गक्रमण करण्यात आले.

       सुगत कुटी येथे बोधिवृक्ष तथा महामानवांना अभिवादन करून बुद्धवंदना घेण्यात आली. व त्यानंतर आदरणीय भन्ते बोधीपालो यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना मार्गदर्शन केले. 

        या त्रिवेणी मंगलमय प्रसंगी बौद्ध जनातील उत्साह,आनंद द्विगुणित झाला होता.समता,करुणा,विज्ञानवादी दृष्टीकोनातून मंगलमय जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या आपल्या मार्गदात्याला,तथागताला मनोभावे अभिवादन करण्यास आलेल्या उपस्थित जनसमुदायचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता खिर दानाने करण्यात आली.

     कार्यक्रमाला समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.