कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- स्थानिक केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी येथील इयत्ता 10 वी चा निकाल 97.45 टक्के लागला.
केसरीमल पालीवाल विद्यालयातून प्रथम कु रिद्धीमा एकनाथ बोरकर-89.30 टक्के, व्दितीय कु. रश्मी ज्ञानेश्वर भुजाडे – 87.40 टक्के, अथर्व मनोहर देवतळे-87.40 टक्के, तृतीय क्रमांक कु. खुशबू नरेंद्र कडू-85-60 टक्के गुण प्राप्त करून यश प्राप्त केले.
केसरीमल पालीवाल विद्यालयातून एकुण 157 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 153 विद्यार्थी पास झाले.
संस्थेचे सचिव दिपक बाबु पालीवाल, सदस्या पुष्पाताई पालीवाल, प्राचार्या हिमांगी गजानन पोटभरे, उपप्राचार्या चित्ता कहाते सह सर्व शिक्षक वृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.



