Home Crime दारु भरलेला ट्रक पकडला,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर अंतर्गत कारवाई… — ४६...

दारु भरलेला ट्रक पकडला,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर अंतर्गत कारवाई… — ४६ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतून अवैध देशी-विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या वाहनास दारूच्या ५३० पेट्यासह चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जप्त केल्यात.

       सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकांनी मोठी कारवाई केली.या कारवाईत ४६ लाख ९३ हजार ८००/- रुपयांचा मुद्देमाल अवैध देशी-विदेशी दारू व वाहनासह मुद्देमालासह जप्त केला आहे.

          आज दिनांक ०१/०५/२०२५ रोजी एक आयशर ट्रक चंद्रपूर जिल्ह्याचे हद्दीतुन अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक गडचिरोली जिल्ह्यात करणार आहे,अशा खात्रीशिर माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार पोलीस स्टेशन चिमूर हद्दीत मौजा बंदर शिवापुर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ या रोडवर प्राप्त माहितीनुसार आयशर ट्रक कं. CG08-AJ-9948 यास थांबवून विचारपूस केली.

     वाहन चालक नामे विशाल देव उइके,वय २७ वर्ष,रा.पाथरी,ता. साकोली,जि.भंडारा व त्याचे साथीदार (२) पप्पु परसराम वाघाडे,रा.बोदरा,ता.साकोली,जि.भंडारा आणि (३) सुरेश बंडुजी युवनाते वय ५० वर्ष,रा.नारी रोड,टेकानाका,लनगर,नागपूरयेथील रहिवासी आहेत.

           सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात अवैध रित्या देशी-विदेशी पवुन वाहतुक करण्यासाठी पिवळ्या रंगाचे प्लास्टिक बोऱ्यामध्ये सोयाबीन वड्या तसेच भांडे घासणीचे बॉक्स होते. 

   त्यापलीकडे लाकडी फळ्या लावुन कप्पा तयार केल्याचे दिसुन आले.त्यामध्ये रॉकेट देशीदारू ML एकुण पेट्या ३५०,किं.१२ लाख २५,०००/- रु.,रॉयल स्ट्रॉग कंपनीची विदेशी दारू 180 ML एकुण ९० किं. ११ लाख २३ हजार २००/- रु. तसेच हॉवर्ड 5000 बियर एकुण ९० पेट्या किं. ३ लाख ४५ हजार ६००/- रु. व आयशर ट्रक कं.-AJ-9948 किं. २० लाख रु. असा एकुण ४६ लाख ९३ हजार ८००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने राज्य न शुल्क विभाग,चिमुर उपविभाग चंद्रपूर यांचेकडुन रॉकेट देशी दारू संत्रा 90 ML एकुण पेट्या ३५० या वरील पाहणी अहवाल घेतला असता सदर रॉकेट देशी दारू संत्रा ३५० पेट्या या बनावट दारु असल्याचे निष्पन्न झाले आहे.

       यावरून नमुद वाहन चालक (१) विशाल कमलदेव उइके व त्याचे साथीदार नामे (२) पप्पु परसराम वाघाडे गुरेश बंडुजी युवनाते (४) विशाल जांभुळकर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

      ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर व राज्य उत्पादन शुल्क विभाग,चंद्रपूर यांचे उपस्थितीत करण्यात आली आहे.

     सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,चंद्रपूर जिल्हा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु,अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोपि दिपक प्रवार,सपोनि बलराम झाडोकार,पोउपनि संतोष निंभोरकर,सफौ स्वामीदास चालेकर,पोहवा गणेश पोहवा नितीन साळवे,जयंता चुनारकर,जयसिंग,प्रकाश बल्की,संजय वाढई,नितीन कुरेकार,अजय र,नापोअं संतोष येलपुलवार,पोअं गणेश भोयर,गोपीनाथ नरोटे,गोपाल अतकुलवार,प्रदिप मडावी,प्रसाद डे,सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.