राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा…
घरगुती वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले असून मेडिकल व्यवसायिक योगेश कवाडकर यांच्यावर लिलाधर भरणे व त्यांचे कुटुंबीयांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडलीआहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कौटुंबिक कारणावरून तिन चार दिवसा पुर्वी झालेला वाद अचानक तीव्र झाला.
यावेळी भरणे कुटुंबातील सदस्यांनी योगेश कवाडकर यांच्यावर हल्ला केला.डोक्यावर रॉड ने हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून दुखपती मुळे ते स्वत: तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.
डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान,जखमी योगेश कवाडकर यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.



