Home देशविदेश लेखा येथे सत्यशोधक कार्यपद्धतीने विवाह सोहळा संपन्न… — बैलबंडीने वरात,“गाणी सावित्री-...

लेखा येथे सत्यशोधक कार्यपद्धतीने विवाह सोहळा संपन्न… — बैलबंडीने वरात,“गाणी सावित्री- जोतिबांची”… — कार्यक्रमातुन प्रबोधन,सर्वत्र विवाह सोहळाची चर्चा…

भाविकदास करमनकर

  तालुका प्रतिनिधी धानोरा..

  (गडचिरोली/महाराष्ट्र)

      धानोरा तालुक्यातील लेखा गावात प्रथमच सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला.क्राऔतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यधर्माचा प्रसार जिल्हात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

       म्हणूनच सत्यधर्मातंर्गत विचारांचा प्रभाव धानोरा तालुक्यातील नागरिकांवर पडलेला दिसतो आहे.

           यामुळेच धानोरा तालक्यातील मौजा लेखा येथील निरांजन मोहुर्ले यांची जेष्ठ कन्या तेजल हिचे धानोरा येथील विश्वनाथ सोनुले यांचे चिरंजीव गुरुदेव सोनुले यांचेशी,”मौजा लेखा,येथे सत्यशोधक पध्दतीने विवाह दिनांक ३० एप्रिल रोजी पार पडला.

     सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,क्रांतीसुर्य महात्मा फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व मार्लापन करुन वधु-वराचा आणि आईवडीलाचा परीचय करुन देण्यात आला.

 

      सत्यशोधक विवाहाबद्ल सत्यशोधक विधीकर्ते सुनील कावळे यांनी माहीती दिली व वधु-वराच्या हातात हार देवून महात्मा फुले रचित मंगलाष्टके म्हणण्यात आले. 

       मंगलाष्टके नंतर पाहुण्यांना साक्षी ठेवुन वधुवरांना शपत देण्यात आली व सत्यशोधक विवाहाचे प्रमाधपत्र नवदाम्पत्यांना देण्यात आले.

       विवाहा प्रंसगी पुरुषोत्तम निकोडे,सुनिल कावळे,विनोद लेनगुरे,सदाशिव सहारे,वामन लोंहबरे,जयश्री सहारे,प्रशांत निकेसर,विजय गुरनुले,अमोल मांदाळे या समाजासाठी झटणा-या कार्यकर्त्याचा सत्कार सोनुले नवदाम्पत्याचा हस्ते करण्यात आला. 

       या सत्यशोधक विवाहाच्या यशस्वीतेसाठी गोविंदा चौधरी,मुखरु मांदाळे,देवानंद भेडारे,विनायक मोहुले,नरेश मोहुले,पवन मोहुर्ले,प्रदिप जेगठे व मिनाक्षी गुरनुले यांनी प्रयत्न केले.

        आदिवासी बाहुल्य गडचिरोली जिल्हातंर्गत धानोरा तालुक्यातील मौजा लेखा या गावात सत्यशोधक विवाह पहील्यांदाच पार पडल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात विशेष कुतुहलातंर्गत चर्चेचा विषय ठरलाय.

        सदर विवाह सोहळ्याचे प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित मंडळींना सत्यशोधक विषयी सविस्तर माहिती दिली.