Home Vidarbha पोलिसाचा शहरातून निघाला रूट मार्च…

पोलिसाचा शहरातून निघाला रूट मार्च…

      उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती

       आगामी लोकसभा निवडनुकीच्या पर्वावर तसेच होणारे शहरात राम नवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, ईद इत्यादि सन् उत्सव शांततेत व सुव्यस्थेत पार पड़ावे करिता दी 3 मार्च ला पोलिसांनी शहरातून मुख्य मार्गावरुन रूट मार्च काढ़ला. 

           हा रूट मार्च पंचशील वार्ड, बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार, वन विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, जामा मस्जिद चौक, गाँधी चौक, नाग मंदीर या मार्गाने समोर निघाला. 

           सदर रूट मार्च सहा. पोलिस अधीक्षक, उपविभागिय पोलिस अधिकारी नयोमी साठम, पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे यांचे मार्गदर्शनात काढण्यात् आला.  

           या रूट मार्च मधे 4 अधिकारी, 18 अमलदार, पो स्टे वरोरा येथील 1 अधिकारी, 5 अमलदार, सी 60 चंद्रपुर येथील 1 अधिकारी, 26 अमलदार, आर सी पी चंद्रपुर येथील 2 अधिकारी, 28 अमलदार, सी आय एस एफ चे 2 अधिकारी, 49 जवान ऐसे एकुन 12 अधिकारी आणि 126 अमलदार हजर होते.