शहराच्या नगरसेवीका तथा प्राणहिता महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष गौरी उईके यांचे दिर्घ आजाराने निधन…

राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

     शहरातील प्रभाग क्र. १६ ची विद्यमान नगरसेवीका तथा प्राणहिता महिला नागरी पतसंस्था कूरखेडा येथील संस्थापक- अध्यक्ष गौरी मंसाराम उईके (४७) यांचे आज दि ३ एप्रील बूधवार रोजी दूपारी ३ वाजता ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्णालयात दिर्घ आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले.

      नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ मध्ये गौरी उईके भारतीय जनता पक्षाचा वतीने प्रभाग क्र १६ येथून निवडून आले होते मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती, बूधवार रोजी ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्णालयात त्यांचे निधन झाले त्यांचा मागे दोन मूली व बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांचा पार्थीवावर उद्या गूरूवार रोजी सकाळी १० वाजता कूरखेडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.