महात्मा फुले विद्यालय, मार्कंडा येथिल दहावीचा निकाल 100 टक्के…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक

खल्लार :- मार्कंडा बहूउद्देशिय शिक्षण, प्रसारक मंडळ,मार्कंडा द्वारा संचलित असलेल्या महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, मार्कंडा येथिल दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

            विद्यालयातील कु ईश्वरी संतोष अवघड हिने विद्यालयातून प्रथम येण्याबरोबरच चंडिकापूर केंद्रातूनही प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. विद्यालयातून कु. ईश्वरी संतोष अवघड हिने घेवून प्रथम क्रमांक मिळवला.

             द्वितीय क्रमांक प्रणव संजय उमाळे तर तृतीय क्रमांक संजीवनी विजय ढेंगळे हिने मिळविला आहे. विद्यालयातील 9 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 2 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले.

             विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.