डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडुन फेकल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करा… — साकोली भाजपातर्फे पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन.. 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – काल दिनांक २९ मे ला चौदार तळ्यावर जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न प. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडून फेकला त्याच्या निषेधार्थ आज दिनांक ३०मे ला भारतीय जनता पक्ष साकोलीच्या वतीने डॉ.नेपाल रंगारी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्या नेतृत्वात साकोली पोलिस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी भंडारा,जिल्हा पोलिस अधीक्षक भंडारा,उपविभागीय अधिकारी साकोली यांना जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

         निवेदन देतेवेळी प्रामुख्याने डॉ. नेपाल रंगारी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ. हेमकृष्ण कापगते माजी आमदार साकोली विधानसभा, किशोर पोगडे भाजपा भंडारा जिल्हा सचिव,सौ. माहेश्र्वरी नेवारे जि. प. सदस्या,सौ वनिता डोये जि.प. सदस्या, नितीन खेडीकर साकोली शहर अध्यक्ष भाजपा, शंकर हातझाडे सेंदुरवाफा शहर अध्यक्ष भाजपा,सौ. धनवंता राऊत माजी नगराध्यक्षा, जगण उईके माजी उपाध्यक्ष न.प.साकोली,सौ. प्रिती डोंगरवार महिला मोर्चा शहराध्यक्षा भाजपा,सौ पुजा देशमुख, देवचंद चांदेवार, देवनाथ रहांगडाले, अभय कापगते, ईश्वरदत्त राऊत, चंद्रभान कापगते, पुरुषोत्तम कोटांगले, अरुण बडोले, डाकराम कापगते, राजेश कापगते, ललित खराबे, रेवेंद्र राऊत व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.