LIFELINE ने केली रक्तक्रांती ची सुरवात.

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

           रक्ताच्या वाढत्या समस्या पाहता, नव युवकांना रक्तदाते म्हणून तयार करण्याचे काम जीवनरेखा सामाजिक बहुउद्देशीय संस्था अंतर्गत येणारी Lifeline social group of india कडुन करण्यात येत असते. त्यासाठी विविध महाविद्यालय, कार्यालय, व इतर शैक्षनिक संस्थेमध्ये जावून त्यांना रक्तदानाचे महत्व, त्यापासून होणारे फायदे व त्यांच सोबत-सोबत थेलेसिमिया, सिकलसेल, व हिमोफिलिया या अनुवांशिक आजाराची माहीती विद्यार्थ्यानं पर्यंत पोहचण्याचे काम करते.

          त्यांच साठी दि. 23 मे 2023 रोजी अमरावती शहरांतील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सामान्य रुग्णालय येथील अधिकारी वर्गाने सिकलसेल तपासणी शिबीर कार्यक्रम राबवण्यात आला तसेच अर्श कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन मुलांमुलींना समुपदेशन करण्यात आले.

         कार्यक्रमाला उपस्थित जिवनरेखा सामाजिक बहुद्देशीय संस्थचे अध्यक्ष – प्रज्वल प्रकाशराव बागडे, प्र. सचिव आनंद गवई , सदस्य प्राची सोनटक्के व तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत येणारे ‘डे केअर’ सिकलसेल समुपदेशक मनोज पाटील सर ,श्री अतुल होले, प्रिती मुन,निशा कोठीकर, अश्विनी म्हैसने, भावना लव्हाळे,प्राचार्य श्री बोरकर सर यांनी उपस्थिती दर्शविली. हजर विद्यार्थांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. युवकांनी योग्य रित्या रक्तदानाबद्दल व सिकल्सेल बद्दल माहिती समजून घेतली.