शेती व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून शासन स्तरावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःची लेखणी निर्भीडपणे लिहिणाऱ्या युवा पत्रकार श्री सुयोग गोरले चा सन्मान… — उत्कृष्ट पत्रकार व समाज सेवक म्हणून राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित… — संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमी नागरवाडी येथे करण्यात आले आयोजन…

 

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

          शेती व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून शासन स्तरावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःची लेखणी निर्भीडपणे लिहिणाऱ्या युवा पत्रकार श्री सुयोग गोरले चांदूरबाजार यांना उत्कृष्ट कृषी पत्रकारिता या गटातून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार 2023 चा बहाल करण्यात आला अनेक मान्यवरांच्या उपस्थित संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमी मध्ये नागरवाडी येथे पुरस्कार वितरित करण्यात आला.

         सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीत देशाच्या लोकशाहीचा मजबूत चौथा स्तंभ असलेले पत्रकारिता क्षेत्राची गळचेपी होत असल्याचे चित्र आहे.परंतु अशा विपरीत परिस्थितीत पत्रकारिता क्षेत्रातले काही अनमोल निखारे आपल्या लेखणीने ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचं कार्य करत असल्याने लोकशाही मजबूत होण्यास अधिक मदत होईल त्या पैकी सुयोग गोरले एक असून त्यांच्या मध्ये गोर गरीब अपंग अनाथ बेघर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब यांच्या परिवाराशी एक आपुलकी प्रेम व आपल्या लेखणी मधून न्याय मिळवून देण्याची जिद्द असल्याचे असे मत राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानअध्यक्ष-प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले.

          दि.27 मे 2023 रोजी नागरवाडी आश्रम येथे युवा कृषी पत्रकार श्री. सुयोग गोरले यांना राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा या कार्यक्रमला मा.श्री. बापूसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ संपन्न झाला. 

         याप्रसंगी या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य सौ.पूर्णिमाताई सवाई, मा.प्रकाशदादा साबळे, डॉ.दिलीप काळे, मा.अविनाश पांडे, मा.नंदूभाऊ बंड, मंगेशराव देशमुख, जीवनराव जवंजाळ संस्थापकअध्यक्ष जीवन आधार सामजिक संस्था नागपूर, तुषार देशमुख आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

          गेल्या 17 वर्षापासून राज्यातील प्रगतशील, प्रयोगशील शेतकऱ्यांना व उत्कृष्ट पत्रकार यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान व अध्यक्ष प्रकाश साबळे यांचा हा उपक्रम सुरू आहे.श्री.सुयोग गोरले यांचा सहपरिवार चा मान्यवरांच्या हस्ते सन्मान नागरवाडी येथे करण्यात आला.

        या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये सदर सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी या वेळी उपस्थित श्री दत्ताभाऊ कीटूकले, ज्ञानेश्वर काळे, अनूल्ला खान ,अक्षय साबळे, रोशन जयसिंगपूरे,बादल डकरे, किशोर मेटे, गौरव देशमुख ,भागवतराव गोरले, नरेशराव कितुकले, शिलाताई गोरले, वनिताताई किटूकले अश्विनी डकरे , समीक्षा किटूकले आदी नागरिक व मान्यवर मंडळी उपस्थित होती.