श्रीराम मराठी प्राथमिक शाळा, आरमोरीच्या विद्यार्थ्यांची सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेत राज्यस्तरावर निवड….

प्रितम जनबंधु

     संपादक 

आरमोरी:- गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे दि. २८/१/२०२४ ला संजीवनी ग्राऊंड, गडचिरोली येथे आयोजित राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धेत श्रीराम मराठी प्राथमिक शाळा, आरमोरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवीले.

                  ज्यामध्ये ६० मीटर रनिंग स्पर्धेत १० वर्षाआतील मुलांच्या गटात कुमार आदित्य ठेंगरी याने प्रथम क्रमांक व गोळाफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर १०० मीटर रनिंग स्पर्धेत १० वर्षाआतील मुलांच्या गटात कुमार प्रथमेश कुकडकर याने द्वितीय क्रमांक व पटकावला तर स्टँडिंग ब्रॉडजम्प १० वर्षाआतील मुलांच्या गटात कुमार.ध्रुव चापले याने प्रथम क्रमांक व १००मीटर रनिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. स्टँडिंग ब्रॉडजम्प या स्पर्धेत ८ वर्षाआतील मुलांच्या गटात कुमार निखिल चौके याने प्रथम क्रमांक पटकावला तर स्टँडिंग ब्रॉडजम्प या स्पर्धेत ८ वर्षा आतील मुलींच्या गटात कुमारी चेतना जुआरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला ८ वर्षाआतील मुलींच्या गटात १०० मीटर रनिंग स्पर्धेत कुमारी.अवनी चौके हिने प्रथम क्रमांक पटकावला.

                       विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय श्रीराम मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरिदासजी सोमनकर सर, रविशजी गुडेलीवार सर व आरमोरी येथील प्रसिद्ध धावपटू दीक्षा तिजारे, प्रिन्स सोमनकर व पालकांना दिले.