“नो पार्किंग” फलका समोरच उभे ठेवली जातात वाहने,शासकीय कार्यालयातील प्रकार..

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

      कुरखेडा येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय येथील नो पार्किंग फलका समोरच कार्यालयात येनारे लोक गाड्या उभ्या ठेवतांनी आढळले आहेत.

        शासकीय कार्यालयात शासकीय कामानिमित्य लोक येत असतात.परंतु साहेब कार्यालयात नसतांना कामाकरिता आलेले लोकही आपली जबाबदारी विसरतात व आपली दूचाकी वाहने नो पार्किंग फलका समोरच उभी ठेवतात.या समस्यान्वय बाबींकडे कडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.

        बहुतेक कार्यालयात नियोजित पार्किंग स्थळ व शेड नसल्या मुळे हा प्रकार दररोज घडतांना दिसत असतो.कार्यालयात येणाऱ्या अभिभावकांना शिस्त लावणे आवश्यक आहे ना?.