जीवन शिक्षण काळाची गरज :- रवींद्र मुप्पावार… — विश्वशांती विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी

           भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक २८ नोव्हेंबरला स्त्रियांचे उद्धार कर्ते,सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

             आज जीवन शिक्षण काळाची गरज बनली आहे,आपल्या सर्व थोर शिक्षणतज्ञांनी,विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जीवन शिक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि सर्वांना जगण्याची एक दशा आणि दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. असे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक धनंजय गुरनुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.तसेच शालेय विद्यार्थ्यांनी बोलक्या वाणीतून भाषणे आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले.

        याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,संजय ढवस,श्वेता खर्चे उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाची सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्रे तर आभार प्रनोती सोनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.