तेथील लैंगिक अत्याचार करण्याची कार्यपद्धतच संतापजनक… — मुजोर प्रवृत्ती आयुष्य बरबाद करू लागली.. — भांदवी कलम ३७६,३५४(अ),३५४(ड),५०४,पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल…

 

दिक्षा ललीता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादीका 

             चारित्र्य हनन करण्याचे विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात आले की त्याच्यावृती अंतर्गत बेकायदेशीर मुजोर विकृतीचा संचार सैरावैरा होत असतोय.

         एकदाचा व्यक्ती सैरावैरा झाला की त्यांने केलेली प्रत्येक अयोग्य कृती त्याला काही काळ मजेदार वाटू लागते व आनंद देणारीही ठरु शकते.

         पण,अत्याचार करणाऱ्या व्यक्तींच्या अत्याचाराचा घडा फुटला की कायदा त्यांच्या मुसक्या आवळतो व त्याच्या बेताल वागण्यावर कसून लगाम लावतो.एवढेच काय तर समाज मन त्याला अविश्वसनीय बनवतो.

          असाच एक लैंगिक घटनाक्रम पुढे आला असून सदर घटनाक्रमांतंर्गत लैंगिक अत्याचारांच्या सर्व सिमाच पार केल्या असल्याने जनमानसात खळबळ उडाली असून,सदर घटनाक्रम क्लेशदायक,भितियुक्त व सभ्य समाजाची झोप उडविणारा ठरला आहे.

             सदर घटनाक्रम नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुकातंर्गत खापा पोलीस स्टेशन हद्दीतील असून अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीच्या गंभीर बयानावरुन आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३७६,३५४(अ),३५४(ड),५०४,पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

         मुख्य आरोपी धिरज हिवरकर रा.खापा यांनी ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला होता व लैंगिक अत्याचार करताना व्हिडिओ क्लिक तयार केली होती व त्याने लैंगिक अत्याचाराची सदर व्हिडिओ क्लिप आपल्या मित्रांना सुध्दा पाठवली होती.

         त्याच्या मित्रांनी लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओ क्लिप अन्वये फायदा उचलीत सदर पिडित मुलीवर मागील दिड वर्षापासून बळजबरीने आडिपाडिने लैंगिक अत्याचार केलाय.

           भितीपोटी शांत,स्तब्ध,चूप राहिलेल्या मुलीला वारंवार होणारा लैंगिक अत्याचार असाह्य झाला तेव्हा तिने आत्महत्या करण्याचे ठरविले.

        मुलगी आत्महत्या करणार असल्याची चाहुल वडिलांना झाली तेव्हा वेळ न दवडता त्यांनी मुलीला धिर देत खापा पोलीस स्टेशन गाठले आणि मंगळवारला लैंगिक आत्याचाराची तक्रार दाखल केली. 

     तक्रार दाखल होताच नागपूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार व संदीप पखाले,उपविभागीय पोलिस अधिकारी अजय चांदखेडे दक्ष झालेत व त्यांच्या मार्गदर्शनात एलसीबी टिमचे पीआय कोकाटे,एपीआय करमलवार व स्थानिक पोलीस यांनी उत्तम कर्तव्यातंर्गत सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.सदर आरोपींचा सात दिवसांचा पिसीआर घेण्यात आला आहे.

            अटक करण्यात आलेल्या आरोपीत लिलाधर धमेंद्र चौरागडे वय १९ (रा.खैरी पंजाबराव),सुशील कृष्णा धार्मिक वय १९,प्रणय सुनील डेकाटे वय १९,निखिल सदाशिव धांदे वय २३,वेदांत विलास आवडते वय २३,गोलू रमेश निखार वय २४,सर्व राहणार खापा,यांचा समावेश आहे.

          सदर प्रकरणात बरेच तरुण अडकले असून पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार,संदीप पखाले,उपविभागीय पोलीस अधिकारी अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनात उर्वरित सर्व आरोपींचा शोध सावनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र मानकर,खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज खडसे आपल्या टीमसह घेत आहेत.

         मात्र,मुख्य आरोपी धिरज हिवरकर सह अनेक आरोपी पोलिसांच्या रडारावर आहेत.