नवजीवन (सीबीएसई) मध्ये पालक शिक्षक संघा ची स्थापना…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली-नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कूल (सीबीएसई) साकोली येथे सत्र २०२३-२४ आणि २०२४-२५ करिता प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. शालेय शिक्षण प्रणाली सुरळित चालावी, नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करणे, अभ्यासक्रमात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ते उपाययोजना सुचविणे, अभ्यासासी पूरक असलेल्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यास शाळांना साहाय्यता करणे व सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे या हेतूने पालक-शिक्षक संघ गठीत करण्यात आला. शिक्षक पालक संघासाठी वर्ग १ ते १० च्या बहुतांश पालकांनी नाव नोंदनी केली होती. प्रत्येक वर्ग तुकडी मधून एका पालकाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. बैठकीची सुचना पालकांना परिपत्रकाद्वारे एक आठवडा अगोदर देण्यात आली होती. शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद, उपाध्यक्ष श्री. महेश शहारे, सचिव सौ. भारती व्यास, सहसचिव सौ. वर्षा ईटनकर व कु. दिशा ईटनकर तसेच सदस्य म्हणून सौ. मोसमी उरकुडे, श्री. विनोद बावनकुळे, सौ. भाविका मल्लानी, सौ. सोनाली इंगळे, सौ. ज्योती लांजेवार, सौ. मुनेश्वरी बोपचे, सौ. मनिषा राहांगडाले, श्री. राजेंद्रकुमार लंजे, डॉ. सुशिल लाडे, सौ. अंजुल गुप्ता, श्री. विनोद राणे, श्री. चेतन कापगते, श्री. अमोल गुप्ता, श्री. विलासानंद गणविर, श्री. मधुकर कापगते, श्री. नरेंद्र पराते यांची निवड करण्यात आली. या वेळी नवजीवन सीबीएसई चे शिक्षकवृंद उपस्थित होते. संचालन भारती व्यास व आभार वंदना घोडीचोर यांनी केले.