भद्रावती पोलिसानी दूचाकी चोरटयां कडून 12,5000 चा मुद्देमाल जप्त करण्यात यश… — शहरातील चार दूचाकी चोरटयाणा न्यायालयाने सुनावली न्यायलईन कोठडी…

उमेश कांबळे

ता प्र भद्रावती- 

         भद्रावती शहरातील दूचाकी चोरटयांच्या धुमाकुळ हा चांगलाच गाजलेला होता, त्यात चार दूचाकी चोरटयाणा भद्रावती पोलिसानी अटक केली असुन भा. द. वि. कलम 379 नुसार न्यायालयाने न्यायलईन कोठडी सुनावली आहे.

 त्यात कुणाल हरिदास उईके, वय 21, राहणार शिवाजीनगर, यश संजय कामतवार, वय 19, राहणार विजासन , राहुल नागोबा बावणे, वय 21, राहणार बंगाली कॅम्प, प्रवीण बंडू मांढरे, वय 23, राहणार विजासन सर्व रा भद्रावती असुन सशयीत इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे कडून एकुन 12,5000 चा मुद्देमाल जप्त करण्यात भद्रावती पॉलिसाना यश प्राप्त झाले आहे, प्राप्त माहिती नुसार आरोपी है हॅण्डल लॉक नसलेल्या, सहजतेने विक्री करून यांचे स्पेअर पार्ट वेगळे करून काही गाड्यांचे इंजिन क्रमांक व चेसेस क्रमांक ग्राइंडरने खोडून, त्यावर लोखंडी पंचिंग शिक्यानी दुसरे इंजिन क्रमांक व चेसिस क्रमांक बदलल्याचे दिसून आले. त्यांचे कडून ग्राइंडर मशीन व लोखंडी पंचिंग शिक्के जप्त करण्यात आलेले आहेत.

           यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने सदर आरोपीची पोलीस कोठडी दिली आहे.सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपणी सो व पोनी बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पो उप नि सुधीर वर्मा, विशाल मुळे, पोलीस अमलदार अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, जगदीश झाडे, निकेश ढेंगे यानी केली.