जिज्ञासा फाऊंडेशन कडून शिवाजी महाराजांना विनम्र वंदन करून,”सिकलसेल ग्रस्तांना दिल्या पोषण आहाराच्या किट!..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

        वृत्त संपादिका

सिंदेवाही : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार साजरी करीत व सामाजिक उपक्रम राबवित तालुक्यातील सिकलसेल (ss) व्यक्तींना पोषण आहाराच्या किट देऊन सामाजिक उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांना विनंम्रपणे वंदन केले.

        कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरी करीत असतांना त्यांच्या विचारांना आत्मसात करून व त्यामधून गोरगरीब नागरिकांना सहकार्य करून मदत केली तर ती समाजात प्रेरणादायी ठरत असतें.

            त्यासाठी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती साजरी करताना,गोरगरीब नागरिकांना सहकार्य करून करायची असा निश्चय जिज्ञासा फॉउंडेशनचे अध्यक्ष राकेश अलोणे यांनी केला होता व त्या साठी तालुक्यातील सिकलसेल व्यक्तीची माहिती घेऊन त्यांना कॉल करून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही इथे बोलवून डॉ.प्रफुल सुने तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.रोहन झाडे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही,तसेच पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या हस्ते पोषण आहाराच्या किट उपस्थित लाभार्थी व्यक्तींना देण्यात आला.

        सदर कार्यक्रमच्या यशस्वी साठी सुनिल गेडाम,सचिन रामटेके,अक्षय चहांदे,तेजु नागदेवते यांनी सहकार्य केले.