उज्ज्वल भविष्याचे अंतिम व उत्तम ध्येय सुजाण विद्यार्थ्यांत व ध्येयक्षम नागरिकात दडलेले आहे :- प्रकाश मेश्राम,अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन..

    रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

         आदर्श विद्यार्थी समाजाला दिशा देऊन प्रेरणा निर्माण करू शकतात अशा प्रकारचे प्रतिपादन चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर कार्यक्रमांतर्गत संबोधित करताना प्रकाश मेश्राम यांनी मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्व आदी विषयावर ते मार्गदर्शन करीत होते.

         सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे अधिक्षक श्री.सुभाष शेषकर होते तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू महाविद्यालयाचे उपप्राचार्य निशिकांत शेरकुरेसर,प्रा.दिवाकर कुंभरे सर,प्रा.डाॅ.मिलमिले सर उपस्थित होते.

            सुभाष शेषकर सर यांनी आजचा विद्यार्थी हा उद्याचा दिपमान आहे हे विचार मांडले तर शेरकुरे सर यांनी निवडणूक प्रक्रिया आणि जाणकार मताधिकार व त्याचा वापर यावर प्रकाश टाकला.

           सविस्तर माहिती देताना मुख्य अतिथी प्रकाश मेश्राम यांनी सांगितले की,शब्द बदलले की वाक्य बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य बदलतात आपण शब्दांचा कसा वापर करतो व उज्ज्वल भविष्याची कशी निवड करतोय हे आपल्यावर अवलंबून आहे.कुंडीत लावलेलं रोपट नेहमी कुणी तरी पाणी घालेल याची वाट पाहत असते.तर जमिनीवर लावलेलं रोपट नेहमी मूळ खोलवर कसे जाईल आणि आपल अन्न स्वतः शोधत असते.

         यापैकी कोणतं रोपट आपल्याला व्हायचं हे आपल्यावर अवलंबून आहे.एनएसएसचे विद्यार्थ्यांमध्ये झेप घेण्याची जिद्द असली पाहिजे अशाप्रकारचे वैचारिक उर्जा निर्माण करणारे महत्वपूर्ण विचार मूकनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर आयोजित nss कॅम्प अंतर्गत कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आपले विचार व्यक्त केले.

       सदर कार्यक्रमाचा लाभ शिबिरार्थी व ग्रामस्थ यांनी घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संबोधी गेडाम केले तर आभार रामटेके यांनी मानले.