स्वा.सावरकर हायस्कूल येथे विद्यार्थीनीना सायकल वितरण…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       स्वातंत्र्यवीर सावरकर हायस्कूल वडेगांव येथे मानव विकास मिशन योजने अंतर्गत शाळेत शिक्षणाकरीता बाहेर गावावरून आवागमन करणार्या सावित्रीचा लेकी विद्यार्थीनीना मोफत सायकलचे वितरण शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष एम बी बावनथडे यांचा हस्ते करण्यात आले.

          याप्रसंगी शिक्षक पालक समीतीचे पदाधिकारी देवेन्द्र गेडाम,कुंदाताई सहारे,गिताताई भोयर,संस्था सदस्य सूनिता बावनथडे, विदर्भ बावनथडे,सर्व शिक्षक कर्मचारी व पालक वर्ग उपस्थीत होते.