जुनी कामठी शेतशिवारात मोहंती फार्म हाऊसच्या विहरीत तोल गेल्याने युवतीचा मृत्यू…

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी…

 

पारशिवनी:- तालुकातंर्गत जुनी कामठी शेतशिवारात मोहंती फार्म हाऊस येथे राहणारे जितेन्द गोस्वामी यांची पत्नी सौ.रविता जितेन्द गोस्वामी हिचाशेत शिवारातील विहिरीत तोल गेल्याने पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 

         मृतक ही घराचे बाजुला असलेल्या विहीरीत पाणी भरव्याकरिता गेली असता,तिचा तोल गेल्याने विहरीत पडुन त्याचा मृत्यु झाला.

           तक्रारदार जितेन्द्र जमनगिरी गोस्वामी राहणार हल्ली मुकाम मोहंती फार्म हाऊस जुनी कामठी शेत शिवार यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसानी मर्ग क्रमाक ३७/२३ अन्वये १७४ नुसार गुन्हा नोद केला आहे. 

         गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि.सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनात दुय्यम पो.नि.यशवंत कदम करित आहे.