आरमोरी तालुक्यात तथा मुख्य शहरात चालु असलेल्या अवैध धंद्यावर तातडीनं लक्ष घालुन संबंधितावर कारवाई करा… — अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल… –पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाकार्याध्यक्ष मुरलीधर भाणारकर याचा इशारा…..

 

प्रितम जनबंधु

संपादक 

         गडचिरोली जिल्हा दारूबंदी असतांनाही आरमोरी शहरात खुलेआम इंग्लिश, देशी, विदेशी तसेच मोहाची दारू विक्री होतांना दिसुन येत आहे. शहरातील चौकाचौकात दारूचे ठेकेदार बिनधास्तपणे दारूविक्री अगदीच जोमात सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्य़ातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आरमोरी शहरात तसेच संपुर्ण आरमोरी तालुक्यात दारू ठेकेदार व मद्य विक्रेते मालामाल होत असून पिणाऱ्याचे मात्र संसार उद्ध्वस्त होत असल्याचे जिवंत उदाहरण बघायला मिळत आहेत. तरीपण संबंधित विभागाकडून कारवाई होताना दिसुन येत नाही. 

                एकंदरीत संपुर्ण आरमोरी तालुक्यात ठिकठिकाणी त्यासोबतच आरमोरी शहरातील मुख्य परीसरात सायंकाळच्या सुमारास तळीरामाची तोबा गर्दी होत असुन यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र नेहमीच बघायला मिळते. मात्र संबंधित प्रशासन मात्र बघ्याचीच भूमिका वटवतोय तर जनसामान्यानी दाद मागायची तरी कुणाकडे? असा यक्षप्रश्न उपस्थित होतो आहे. एवढेच नव्हे तर फोनद्वारे घरपोच दारू मिळत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना दारूच्या आहारी जाण्यास प्रोत्साहन मिळत असुन युवा वर्ग नशेच्या आहारी गेलेला दिसुन येत आहे. याला प्रामुख्याने जबाबदार कोण? असे एक नव्हे तर अनेक खडबडजनक सवाल आरमोरीकराना त्रस्त करून सोडत आहेत.

             वरील इत्यंभूत विचाराधीन बाबिचे गांभीर्य विचारात घेऊन संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून सबब मद्यविक्रेते व दारु ठेकेदार यांचेवर कठोर कारवाई करुण प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर भाणारकर याणी प्रसिद्धीपत्रकातुन दिला आहे.