रोडवरच झाले पट्टेदार वाघाचे दर्शन…. — अन् प्रवाशांची उडाली तारांबळ…

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी – तालुक्यातील वैरागड पासून तीन किमी अंतरावर झाले वाघाचे दर्शन.

अचानक वाघाचे रोडवर आगमन झाले अन् प्रवाशांची उडाली तारांबळ.

आरमोरी परिसरात फिरत असणारा वाघ आज सायंकाळचे दरम्यान वैरागडवरून पश्चिमेस आर्मोरी रोडवर रस्ता ओलांडत असताना प्रत्यक्षदर्शी नी बघितले.

तो वाघ चामोर्शी साइडला गेल्याचे समजते.

           प्रवास करतांना सावधानतेने प्रवास करण्याचे वनविभााकडून वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी म्हटले आहे. मुखरु किनेकर आर. ओ. आणि वनविभागाची टीम यांनी त्या ठिकाणावर भेट दिल्याचे समजते.