वाघ तर आहे आता हत्ती ही!… — परिसरातील जनता दहशतीत…

ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी – तालुक्यातील शंकरनगर, सांलमारा, पाथारगोटा परिसरात वाघाचे अस्तित्व आहे. आता रानटी हत्ती ही मंजेवाडा परिसरात आल्याची माहिती प्राप्त झाल्याने जोगिसांखरा परिसर दहशतीत आहे.

           कालच वाघाने हमला करून शेळी व गायीचा फडशा पाडला. जोगिसांखरा येथील यशवंत कुमरे यांच्या मालकीची शेळी तर खुमा गरफडे यांच्य मालकीची गाय असल्याचे समजते.

             शंकरनगर रस्त्याच्या बाजूला T1 व T 2 वाघ वाघीण यांनी हा कारनामा करत आहेत तोच हत्तीचे आगमन याच परिसरात झाल्याने परिसरातील जनता भयभित झाले आहेत तरी सबंधित विभागाने लक्ष देऊन वाघ व हत्तीचा बंदोबस्त करावा. अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.