सामाजिक शास्त्रातील संशोधन हे समजाभिमूख होण्याची गरज : डॉ. हनुमंत शिंदे 

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : अलिकडील काळात आपली समाजरचना अतिशय जटिल होत चालली असून सामाजिक शास्त्रामध्ये संशोधनासाठी मोठी संधी आहे याशिवाय सामाजिक शास्त्रातील संशोधन हे अधिकाधिक समाजभिमूख व समाज-उपयोगी झाले पाहिजे असे प्रतिपादन प्रितम प्रकाश महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.हनुमंत शिंदे यांनी केले. ते राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी , भोसरी, पुणे येथील अर्थशास्त्र विभाग आयोजित ‘संशोधन कार्यप्रणाली’ या विषयावर आयोजित तीन दिवशीय कार्यशाळेत ‘तथ्य संकलन आणि नमुना निवड तंत्र’ (Data Collection & Sampling Techniques ) या विषयावर बोलत होते. डॉ.शिंदे म्हणाले की, आज आपल्या देशात आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्क्रुतिक क्षेत्रात असंख्य समस्या आहेत आणि या समस्यांवर आधारित संशोधन झाल्यास ते समाज्याच्या द्रुष्टीने निश्चितच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी तथ्य संकलन करण्याचे विविध स्रोत, नमुना निवडीच्या शास्त्रीय पद्धती, तथ्यांचे विश्लेषण यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक शास्त्रात संशोधन करतांना नमुन्याचा पर्याप्त आकार आणि नमुना निवडीसाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास त्यापासून निघणारे निष्कर्ष हे वस्तुस्थितीच्या जवळ जाणारे असतात असे मत व्यक्त केले. रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.श्रेया दाणी यांनी पाहुण्यांचा परिचय केला,कला शाखा प्रमुख डॉ.सजीत खांडेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, प्रा.रेश्मा लांडगे यांनी सूत्रसंचालन केले व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.दिपक पावडे यांनी आभार मानले.

यावेळी राजमाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक पाटील, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.कमलेश जगताप, प्रा.रेशमा लांडगे, प्रा.देवदत्त शेळके, प्रा.संजय चव्हान,प्रा.सविता वीर, प्रा.मीनाक्षी मांढरे, प्रा.अनिल गंभीरे, प्रा.किशोर मुठेकर, प्रा.सुग्रीव अडल,चाकण महाविद्यालयाचे प्रा.डॉ.हेमकांत गावडे पाटील,प्रितम प्रकाश महाविद्यालयाचे डॉ.स्वाती वाघ, प्रा.प्रवीण म्हस्के, प्रा.सचिन पवार, प्रा.विभा ब्राम्हणकर या शिक्षकासह, मोठ्या संख्येने विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.