गोविंदपूर येथिल सार्वजनिक शौचालय बनले शोभेची वस्तु…

 

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

 

 

चांदुरबाजार तालुक्यातिल गोविंदपुर या गावाला आर आर आबा पाटील स्वच्छतेचा जिल्ह्यातुन संयुक्त पुरस्कार मिळाला पंरतु गाव स्वच्छ दिसत नाही गावामध्ये रस्त्याचे बाजुला शेणखताचे ठिगारे आहे त्यामुळे गावात रोगराई पसरु शकते याला जबाबदार गोविंदपुर ग्रामपंचायत राहील काय गोविंदपुर गाव हागणदरीमुक्त असुन येथील नागरीक शौचाकरीता बाहेर जातात ग्रामपंचायतचे वार्ड क्रमांक ३ मध्ये सि.सि.टिव्ही कॅमेरे लागले आहेत त्यामध्ये शौचाकरीता बाहेर जाणारे नागरीक पाहुन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी परंतु ग्रामपंचायत त्याकडे चालढकल करीत आहे तरी अशा ग्रामपंचायतला पुरस्कार हा मिळाला कसा हा चर्चेचा विषय बनला आहे.तसेच गावातील काही ठिकाणी खांबावरचे लाईट कित्येकदिवसापासुन बंन्द आहेत तर काही ठिकाणचे खांबावरचे लाईट रात्रदिवस सुरु राहतात परंतु गोविंदपुर ग्रामपंचायत याकडे अजिबात लक्ष देत नाही तरी वरीष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी गोविंदपुर येथील नागरीकांची मागणी आहे.