वारजूकर भावंडांना कमी लेखून चालणार नाही? — राजकीय समीकरण आणि सामाजिक मन…

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

        प्रत्येक क्षेत्रात लहान्याच मोठं होण आपापल्या कर्तव्याचा व श्रमाचा भाग असतो आणि वेळेचा सदुपयोग असतो.तद्वतच राजकारणाचे समिकरण हे समाजमनावर अवलंबून राहात असल्यामुळे प्रत्येकांच्या जवळ सातत्याने यश असेलच असे नाही.

           यशाचे गमक मानसिक वृत्तीला व वैचारिक दृष्टीला मजबूत करीत असले तरी पक्ष हितासाठी आपापल्या परीने सर्वांचे असलेले योगदान कशातही तोलता येत नाही हे निर्विवाद सत्य मानले गेले आहे.

         पक्ष हितासाठी कुणाचे कुठले तरी श्रमयुक्त संघटन योगदान व इतर प्रकारचे योगदान त्या पक्षाच्या ताकदीला व मजबूतीला टिकवून ठेवण्यासाठी समर्पित असते हे सुद्धा विसरून चालणार नाही.

           वरील राजकीय गमकाला गृहीत धरले तर माजी आमदार तथा माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेता डॉ.सतीष वारजूकर यांच्या राजकीय व सामाजिक बांधिलकीला बाजूला सारता येत नाही किंवा कमी लेखता येत नाही. 

       मागील २७ वर्षांपासून डॉ.अविनाश वारजूकर व डॉ.सतीष वारजूकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय व सामाजिक पकड घट्ट करून ठेवली आहे हे सुद्धा नाकारता येत नाही.

           राजकीय व सामाजिक क्षेत्रातंर्गत वारजूकर भावंडांची विविध समाज घटकातील नागरिकांसी असलेले सामाजिक ऋणानुबंध व आपुलकीचे नाते कुणालाही कमी करता येणार नाही किंवा तोडता येत नाही हे वास्तव आहे.

          वारजूकर भावंडांच्या समाजमनाला व राजकीय शक्तींना नाकरणे म्हणजे उलट पक्षाचे अहित करणे होय.ज्या व्यक्तींनी पक्ष हितासाठी किंवा पक्ष बळकटीसाठी सर्वकाळ वेळ दिला व सर्वस्व पणाला लावले त्यांची राजकीय-सामाजिक शक्ती कमी झाली असे होत नाही. 

         मागील विधानसभा निवडणुक अंतर्गत डॉ.सतीष वारजूकर यांना ७७ हजारांच्या वर मतदार पसंती देतात म्हणजेच त्यांची राजकीय व सामाजिक शक्ती उलट वाढलेली दिसून येते आहे.

          मागील २५ वर्षांचा राजकीय व सामाजिक प्रवास बघितले तर चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत प्रत्येक गावात वारजूकर भावंडांची राजकीय व सामाजिक शक्ती वाढलेली दिसून येते आहे.

        याचबरोबर राजकीय व सामाजिक नितीक्षेत्रात ते प्रगल्भ झाले असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही.मात्र त्यांना विचार पिठावरुन शिव्या देता येत नाही हे स्पष्ट आहे.

         काही का असेना चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील प्रबळ तथा तुल्यबळ व्यक्तीत्वे म्हणून डॉ.अविनाश वारजूकर व डॉ.सतीष वारजूकर या दोन भावंडांची नावे समोर येतात.

        म्हणूनच चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात त्यांना नाकारुन चालणार नाही किंवा बाजूला सारून चालणार नाही…