नंदलाल पाटील कापगते यांची 100 वी जयंती साजरी….

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

     साकोली -नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव शिक्षणमहर्षी नंदलाल पाटील कापगते यांची 100 वी (जन्मशताब्दी वर्ष) जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

       या नियोजित जन्मशताब्दी उद्घाटनीय कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधरजी गजापुरे (सेवानिवृत्त शिक्षक), प्रमुख वक्ते डॉ.अजय पोहरकर (अध्यक्ष राज्य पशुवैद्यक परिषद नागपूर) तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेमकृष्णजी कापगते (माजी आमदार), 

 बाळाभाऊ काशीवार (माजी आमदार), प्रकाशजी बाळबुद्धे (माजी विक्रीकर उपायुक्त), संजय नंदलाल कापगते, शरद नंदलाल कापगते, ॲड. दिलीप जी कातोरे, ॲड. मनीष जी कापगते, नामदेवजी झोडे, हांडेकर साहेब नागपूर, डी.डी.कोसलकर (माजी मुख्याध्यापक), प्रदीप गोमासे (माजी मुख्याध्यापक),डॉ.शकुंतला बाई कापगते, लिलाबाई काशीवार ,पद्माबाई कापगते व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

       कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून नंदलाल पाटील कापगते व राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथींचे स्वागतगीताने व पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले तसेच सुगम संगीताच्या तालावर नंदलाल पाटील यांना समर्पित गुणगौरव गीत सादर करण्यात आले. 

       कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.अजय पोहरकर नंदलाल पाटील साहेबांशी आलेले अनुभव हितगुज करताना म्हणाले, पाटील साहेबांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना कुठेही आर्थिक परिस्थिती आड येऊ नये म्हणून स्वतःच्या पैशाने त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून प्रवाहात आणले, पाटील साहेब हे स्वतःचा नाही तर भविष्यातील पिढीचा सतत विचार करित होते. भावी पिढी घडविण्यासाठी निरक्षर, अज्ञानी जनतेला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी, सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणून शैक्षणिक कार्यात पाटील साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले, असे मार्मिक मनोगत डॉक्टर अजय पोहरकर यांनी व्यक्त केले. 

        कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नंदलाल पाटील साहेबांनी अथक मेहनतीतून ,परिश्रमातून शिक्षणाची गंगा जनतेपर्यंत पोहोचवून अनेक निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून ते आज देश – विदेशात विविध क्षेत्रात उच्च पदावर असून नावलौकिक प्राप्त करीत आहेत.न भूतो न भविष्यती अशी कामगिरी शैक्षणिक क्षेत्रात पाटील साहेबांनी केली आहे. पाटील साहेबांचा इतिहास कोणी लपविला म्हणजे तो खोटा ठरत नाही किंवा त्याचे महत्त्व कमी होत नाही ,पाटील साहेबांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अजरामर आहे आणि राहणार असे आपले मनोगतातून डॉ.अजय पोहरकर यांनी व्यक्त केले. 

        याप्रसंगी डॉ.हेमकृष्णजी कापगते, प्रकाशजी बाळबुध्दे, बाळाभाऊ काशीवार, सौ नलिनीताई कापगते अशा अनेक मान्यवरांनी नंदलाल पाटील यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले. 

         जन्मशताब्दीचे औचित्य साधून विद्यालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्यात आले, यावेळी डॉ. शर्वरी खुणे, डॉ. भास्कर गायधने, डॉ. आलोक कापगते, डॉ. आनंद कापगते, डॉ. किशोर कापगते डॉ. मोहिनी हांडेकर ,अनिल कापगते व इतर यांनी आरोग्य तपासण्यासाठी मोफत सेवा देऊन सहकार्य केले. तसेच विद्यालयातील परिसरात विविध जातीचे रोपटे लावून प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या संचालन प्रा.के.जी.लोथे सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. एस. वाय.क-हाडे यांनी केले. सरतेशेवटी कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम ” या गीताने करण्यात आले. 

        कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकार्य केले.