योग ही जागतिक चळवळ.:-डॉ.रविंद्र सावरकर..

 

युवराज डोंगरे/खल्लार 

  उपसंपादक

 छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना याच्या संयुक्त विद्यमाने आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आभाशी पद्धतीने साजरा करण्यात आला. योग दिवसाचा विषय योगिक सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम व मुद्राचे महत्व हा आहे.

     या योग दिनाचे प्रास्ताविक डॉ.हरीश काळे (शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख ) यांनी या प्रसंगी सांगितले की, एक सहज सुंदर आणि छान जीवन कसं जगावं हे सांगणारा माध्यम म्हणजे योग खरंतर आपल्या देशाला योगाची परंपरा तशी जुनीच आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो हा दिवस साजरा करायला 2015 पासूनच सुरुवात झाली. 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली. योगाच्या विविध शैलीमध्ये शारीरिक मुद्रा शश्वासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा समावेश असतो. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे ” मानवतेसाठी योगा “. असे प्रतिपादन केले.

       या योग दिनाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.रवींद्र सावरकर ( योगतज्ञ, संचालक शारीरिक शिक्षण विभाग स्व.छगनला मुंगसाजी कडी महाविद्यालय,अचलपुर) यांनी सांगितले की, योग म्हणजे एकजूट होणे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी योगासने करण्यात येते. खरंतर योगा हा शांती आणि आत्म विकासाचा समानार्थी मानला जातो. ही एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक क्रिया आहे जीवात ज्याद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते.180 हुन अधिक देशात योगा दिवस साजरा केला जात आहे, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग ही जागतिक चळवळ बनली आहे. योगाचा विचार आणि समुद्राचा विस्तार यांच्यातील परस्पर संबंधावर आधारित आहे. तसेच सरांनी योगाचे विविध प्रकार या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. ज्ञानयोग,कर्मयोग, भक्तियोग,राजयोग,हट योग,मंत्र योग, आसन आणि प्राणायाम करून दाखविले आहे.

       या योग दिनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे यांनी याप्रसंगी सांगितले की, आज जगभरातील लोक योग आणि वसुदेव कुटुंबकम या संकल्पनेवर एकत्र येत योग करत आहे.योगाद्वारे आपल्याला आरोग्य,आयुष्य,आणि शक्ती मिळते, असे आपल्या शास्त्रात सुद्धा सांगितले आहे वैयक्तिक पातळीवर चांगले आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. योगामुळे सशक्त समाज निर्माण होतो असे प्रतिपादन केले.

       या योग दिनाचे सूत्रसंचालन डॉ.आशिष काळे ( राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ) यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. भारत कल्याणकर यांनी केले. हा योग दिवस यशस्वी करण्याकरता महाविद्यालयाचे प्राध्यापक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.