महाराजस्व अभियाचा नागरिकांना मोठा लाभ झाला : आमदार दिलीप मोहिते पाटील… — शासन आपल्या दारी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : राज्यशासनाने दैनदिन प्रश्न निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी राज्यभरात शासन आपल्या दारी अभियानातून महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक महसूल प्रशासनातर्फे अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात शिबीर घेऊन शेवटच्या घरापर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने नक्कीच या महाराजस्व अभियाचा नागरिकांना मोठा लाभ झाल्याचे प्रतिपादन खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी या महाशिबाराचे आयोजन फ्रुटवाला धर्मशाळा येथे करण्यात आला होता. या शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.

यावेळी कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, बबनराव कुऱ्हाडे, विलास कातोरे, डी.डी.भोसले, सचिन घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, विलास घुंडरे, प्रदिप बवले, रुपाली पानसरे, शारदा गोरे, उषा नरके, नंदकुमार वडगावकर, अनिकेत कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद, अरुण घुंडरे, संदेश तापकीर, सतीष कुऱ्हाडे, नियती शिंदे, आनंद रणदिवे उपस्थित होते.

याशिबारात महसूल विभाग, आधार कार्ड नोंदणी, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पोस्ट विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नगरपरिषद विभाग, पशुसंवर्धन दुग्धविकास विकास, भुमी अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग अशा सर्व विभागामार्फत नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात रेशनकार्ड धारकांना कार्ड आणि विविध विभागांचे प्रमानपत्र आमदार दिलीप मोहिते पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.