काळ्या आईला वाचवण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज.:-अनिल किरणापुरे

संजय टेंभुर्णे 

कार्यकारी संपादक

दखल न्युज भारत 

भंडारा कृषी महोत्सव कार्यक्रमाचे अवचित्ये

         कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा अंतर्गत कृषी महोत्सव कार्यक्रमात दुसऱ्या दिवसाच्या सत्रात नैसर्गिक जैविक सेंद्रिय शेती व शेतीपूरक व्यवसाय या विषयावर युवा शेतकरी अनिल किरणापुरे यांनी केले.

              शेतकऱ्यांना मार्गदर्शन सेंद्रिय जैविक शेती केली नाही तर भविष्यात माती देखील नष्ट होईल आणि याचे संकेत आपल्याला मित्र कीटक नष्ट झाल्याचे दिसत आहेत. शेतीसाठी ज्या मित्र कीटकांचे मोलाचे योगदान शेतकऱ्यांना लाभते तेच मित्र कीटक नष्ट झाले आहेत. ज्या दिवशी संपूर्ण मित्र कीटक नष्ट होतील.त्या दिवशी माती देखील नष्ट होईल पृथ्वी पण नष्ट होईल.आणि समाजात जगणारे घटकांना वाचवायचे असेल तर जैविक सेंद्रिय शेती करून पर्यावरणाला व आरोग्याला वाचवण्यासाठी नैसर्गिक शेती अत्यंत महत्त्वाची आहे.

            रासायनिक खते औषध यांचा अती वापरामुळे शेती बजंर होत आहे आणि या काळ्या आईला वाचवण्याच्या मिशनमध्ये आपण सहभागी होऊन सेंद्रिय शेती स्वतःसाठी आपल्या काळ्या आईसाठी देशासाठी करा.

           रसायनमुक्त अन्न , विषमुक्त अन्न आपण देशाला समाजाला दिला तर त्याच्याशिवाय मोठी समाजसेवा काय असु शकते याचा आपण विचार केला पाहिजे.

          तसेच शेतीपूरक व्यवसाय शेळी पालन, कुक्कुटपालन, मत्स्य पालन, दुग्ध व्यवसाय हे देखील असणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना निसर्गांनी साथ दिली नाही तर शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्याचे काम करते.

             म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून पूरक व्यवसाय असणे गरजेचे आहे .तसेच युवा शेतकऱ्यांना या कृषी महोत्सवानिमित्त सांगू इच्छितो की आपल्या कडे शेती किती आहे हे महत्त्वाचे नाही आपण शेती कशी करतो व शेतीत काय पिकवतो हे महत्त्वाचे आहे म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन योग्य प्रकारे शेतीमध्ये श्राश्वत मॉडल तयार करा आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याच्याकडे आपण लक्ष द्या असे ते सांगत होते.