गणराज मित्र मंडळ सुतार वस्ती यांच्यातर्फे नूतन पोलीस अधिकारी पदी नियुक्ती झालेले वैभव नरूटे व समाधान बंडगर यांचा सन्मान करण्यात आला..

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 26

प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार,

          पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील गणराज मित्र मंडळ सुतार वस्ती या सर्व गणराज भक्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने पोलिस अधिकारी पदी नियुक्ती झालेले पिंपरी बुद्रुकचे वैभव बापूराव नरूटे व गोंदी गावचे समाधान बंडगर यांचा सुतार वस्ती येथील सर्व गणराज मित्र मंडळ यांच्या वतीने शाल श्रीफळ व फेटा बांधुन सन्मान करण्यात आला .

          वैभव नरूटे व समाधान बंडगर या दोघांची नुकतीच मुंबई शहर पोलीस पदी नेमणूक झाल्याबद्दल सुतार वस्ती येथील सर्वांच्या वतीने चंद्रकांत सुतार व सिताराम बोडके यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. वैभव बापूराव नरूटे हा लहान पणापासून आई-वडील नसताना जिद्द व चिकाटी धरून आजीचा व मोठा भाऊ सुजित यांचाआधार घेऊन शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण करून पोलीस भरतीसाठी नेहमीच प्रयत्नसील होता .आभ्यासाच्या कष्टाने पोलीस पदाचे फळ मिळाल्याबरोबर सुतार वस्ती यथे सत्कार स्वीकारत आसताना वैभव नरूटे यांनी आनंद व्यक्त केला.

         या कार्यक्रमासाठी गणराज मित्र मंडळ सुतार वस्ती येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ भागवत सुतार , चंद्रकांत सुतार ,सिताराम बोडके , माजी सरपंच हारीभाऊ सुतार, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोडके, ,दिपक बोडके ,आप्पासाहेब सुतार ,हानुमंत सुतार ,आजिनाथ बोडके, संतोश सुतार , संजय सुतार , आरुण बोडके , लक्ष्मण बोडके , प्रभाकर सुतार ,भारत सुतार , शशिकांत सुतार , राजेंद्र नरुटे, आरजुन सुतार ,ज्ञानदेव नरुटे, सुजित नरूटे ,किशोर सुतार ,महेश सुतार ,बापुराव सुतार , इत्यादी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .

फोटो:-पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सुतार वस्तीच्या वतीने नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करीत आसताना गणराज मित्र मंडळ .