सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या….. — गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना….

प्रितम जनबंधु

संपादक 

              तुमसर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोबरवाई रेल्वे फाटका जवळ उभ्या असलेल्या एका कारमधील इसमावर एका अज्ञात मारेकऱ्याने गोळ्या झाडल्या. त्यात संबंधित इसम गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असुन जुन्या वादातून हा प्राणघातक हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

          प्राप्त माहितीनुसार सदर इसम तुमसर येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पोलिसांनी नावाबद्दल कोणताही दुजोरा दिलेला नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास तुमसर-कटंगी-बालाघाट या आंतराज्यीय महामार्गावर घडली.

           गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ सिने स्टाईल पाठलाग करुन तुमसर येथील रहिवासी असलेल्या इसमावर एका अज्ञात मारेकऱ्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. कारमधून ही व्यक्ती प्रवास करीत होता. दरम्यान गोबरवाहीजवळील रेल्वे फाटक बंद होत. ही संधी साधून मारेकऱ्यांनी डाव साधला. यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे. जुन्या वादातून हा प्राण घातक हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

            पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली असून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोरवाहीचे पोलिस निरीक्षक नितीन मदनकर व तुमसर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे व उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस विभागाकडून कसुन चौकशी व तपास सुरु आहे.