राष्ट्रीय महामार्गावर फसले दोन ट्रक… — रात्रोपासून धानोरा मुरूमगाव रस्ता बंद… — रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता…

 

   भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

       पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे धानोरा ते मुरूमगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० या रोडवर सालेभट्टी या गावाजवळ मोठ मोठे खड्डे पडले खड्ड्यात सी जी ०८ ए वि ८८८३ या क्रमांकचा छत्तीसगड ला जाणारा ट्रक काल सोमवार ला फसला होता. 

         सोमवार च्या रात्री आठ वाजता त्याचं ठिकाणी पी अप पलटी झाली.तिला रात्रीच काढली नंतर रात्री दहा वाजता छत्तीसगड वरून येणारे ट्रक क्रमांक सी जी ०८ ए एम ९४४३ हा ट्रक काढत असताना त्याचं खड्यात फसला तर थोड्या वेळाने छत्तीसगड मार्गाने येणारा ट्रक क्रमांक सी जी ०४ एल आर ०७७९ हा ट्रक निलगिरी चे लाकडे घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनी काढतानी तोही फसला त्यामुळे सकाळ चि गडचिरोली वरून येणारी बस मुरूम गावला न जाता तिथूनच वापस गेली. रस्ता बंदचा फटका बसला सुद्धा बसला आहे.

         त्यामुळे सकाळी येणारे शाळेचे व कॉलेजचे विद्यार्थी यांनाही फटका बसला रात्र पासून रस्ता धानोरा मुरूमगाव रस्ता बंद आहे.त्यामुळे इतर वाहनांना जपतलाई मोहली मार्गाचा जास्त फेरा करून पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांना करावा लागत आहे. दोन ट्रक फसल्याने ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक रात्री पासून बंद झाली आहे. 

        काल आपली वाहने काढण्यासाठी रस्त्याची मरम्मत करून आपली वाहने काढले पण आज मंगळवार ला रास्तच बंद झाला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे कि काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अजून पर्यंत राष्ट्रीय महामार्गनी दखल घेतली नाही अपघात होऊन कोणाचा जीव गेल्यावर च जाग येईल का ? त्यामुळे वाहन धारकांकडून व नागरिकां कडून रस्त्यावरचे खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा अन्यथा रस्त्याच बंद करू असे समस्त सालेभटी व धानोरा परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.