“अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्यावर गडचिरोली घटकातील एकुण 5 गुन्ह्रांतील जप्त गांजा केला नाश”…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

दिनांक 26.06.2023 रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्यावर पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समीतीने गडचिरोली घटका अंतर्गत येणा­या 04 पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या 05 गुन्हयातील जप्त मुद्देमाल शासनाने निर्गमीत केलेल्या व सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी निर्देशाप्रमाणे कार्यवाही करुन जाळुन नाश करण्यात आला.

       सदर कारवाई दरम्यान पोस्टे कुरखेडा येथील 02 गुन्हे, पोस्टे पुराडा, गडचिरोली, धानोरा येथील प्रत्येकी 01 अशा एकुण 05 गुन्ह्रातील एकुण 90.718 कि.ग्रॅ. गांजा (अंमली पदार्थ) जाळुन नाश करण्यात आला. 

       सदर प्रक्रिया ही समितीचे अध्यक्ष श्री. नीलोत्पल (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक गडचिरोली, कमेटी मधील सदस्य श्री. कुमार चिंता (भा.पो.से.) अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली, श्री. प्रमोद बानबले, प्र. पोलीस उप अधिक्षक (मुख्या.) गडचिरोली तसेच श्री. उल्हास पी. भुसारी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर येथील सहा. रासायनिक विश्लेषक, श्री. केशव शामराव कापगते, वजन मापे विभागाचे प्रतिनीधी रुपचंद निंबाजी फुलझेले निरीक्षक, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच श्री. संदिप आष्टीकर, श्री. प्रदिप पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आली.

      सदर कार्यवाही करीता स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि दिपक कुंभारे, पोहवा/नरेश सहारे, पोना/राकेश सोनटक्के, पोना/शुक्रचारी गवई, पोना/दिपक लेनगुरे, पोशि/माणिक दुधबळे, पोशि/सचिन घुबडे, पोशि/मंगेश राऊत, चापोना/माणिक निसार, चापोना/मनोहर टोगरवार, फोटोग्रॉफर देवेंद्र पिद्दुरकर, पंकज भगत यांनी सहकार्य केले.