राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान…  

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

 गडचिरोली,(जिमाका)दि.26: मा. पंतप्रधान दि. 27 जून 2023 रोजी मध्यप्रदेशातील शहादोल जिल्ह्यात राष्ट्रीय सिकलसेल मिशन या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. त्याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्य मंत्री, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाबाबत पोर्टल, ट्रेनिंग मटेरीयल, जनजागृती मटेरीयल तसेच जेनेटीक कार्ड वितरण अशा विविध कार्यक्रमाचे उद्घाटन मा. पंतप्रधान दि. 27 जून 2023 रोजी करणार आहेत. त्यानूसार जिल्हास्तरावर व सर्व आरोग्य संस्थावरुन अधिकारी व कर्मचारी यांना या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात येत आहे. तसेच सिकलसेल तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तीस सिकलसेल कार्ड वितरीत करावयाचे आहे. तपासणी अहवालानूसार पांढरे, पिवळे व लाल रंगाचे कार्ड अनुक्रमे नॉर्मल, सिकलसेल वाहक, सिकलसेल रोगी व्यक्तींना देण्यात येणार आहे.

 दि. 27 जून 2023 रोजीच्या वाटप करण्यात येणाऱ्या सिकलसेल कार्डचा लाभ जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.