ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी चा निकाल आन लाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला, यामध्ये जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय जोगीसाखरा या विद्यालयाचा ९५% लागला असून विज्ञान शाखेचा ९८% व कला शाखेचा ९३% लागला आहे, विज्ञान शाखेतून रोहन आनंदराव खरकाटे दिव्यांग विद्यार्थी याने ६३.१७% गुण प्राप्त करून आरमोरी तालुक्यातून दिव्यान्गामधून प्रथम येवून या विद्यालयाची मान उंचावून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विदयालयातून विज्ञान शाखेचे प्रथम क्रमांक. निकेतन चांगदेव सोरते(६८.८९%) द्वितीय.कु. विद्या दिवाकर राऊत(६४.८८%) तृतीय आयुष किशोर हेमके(६३.१७%) कला शाखेतून प्रथम कु.पूजा रमेश मोहुर्ले(७९.५०%) द्वितीय- कु मीनाक्षी अनिल लुटे(७६.५०%) तृतीय- शैलेश कुंडलिक गुरनुले(६७.५०%)गुण मिळविले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुरुनानक सोसियाल ट्रस्ट देसाइगंज चे अध्यक्ष हिरा जे. मोटवानी, सचिव किसन एच. मोटवानी व इतर सर्व सदस्यांनी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्यात.या विदयालयाचे प्राचार्य श्रीकृष्णा एम. खरकाटे, इंद्रजीत डोके, अजय सपाटे, प्रवीण ढोरे, जगदीश प्रधान कैलाश दिघोरे, महेश उरकुडे, ताजेश तुम्बडे, सारंग जांभुळे, प्रेमानंद मेश्राम, यशवंत मरापे व श्रावण राऊत विद्यार्थ्यांचे घरोघरी जावून पेढे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून विद्यार्थी त्यांचे आई वडील व पालक यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता सर्व शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोलाचे सहकार्य केले.