Home Maharashtra केशव बोडके व प्राजक्ता बोडके यांच्या शेती क्षेत्रातील इतर शेतकऱ्यांनीही आदर्श घ्यावा...

केशव बोडके व प्राजक्ता बोडके यांच्या शेती क्षेत्रातील इतर शेतकऱ्यांनीही आदर्श घ्यावा :- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे… — सेंद्रिय शेतीतून आर्थिक उन्नती हाच आदर्श दत्तात्रेय भरणे यांचे प्रतिपादन,शासनाच्या वतीने पिंपरी बुद्रुक येथील केशव बोडके सह पत्नी यांच्या सन्मान प्रसंगी उद्गार…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील आदर्श शेतकरी कुटुंब प्रगतशील बागायतदार केशव शिवाजी बोडके व प्राजक्ता केशव बोडके यांनी उत्कृष्ट शेती केल्याबद्दल बोडके परिवार यांचा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व फुलाचा गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या.

          विषमुक्त सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबवून अधिक उत्पन्न घेऊन आर्थिक उन्नती घडवणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.

         पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती कृषी विभाग यांच्या वतीने 2024-25 मध्ये पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार केशव बोडके व प्राजक्ता केशव बोडके यांचा सन्मान करण्यात आला.

          या वेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, साखर कारखान्याचे संचालक व आदर्श मा. सरपंच श्रीकांत बोडके, मा. सरपंच ज्योती बोडके, प्रगतशील शेतकरी केशव बोडके, उपसरपंच संतोष सुतार ,जगु मामा माहिते सह उपस्थित होते मंत्री भरणे म्हणाले, की इंदापूर तालुक्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

         त्यामधून मोठी आर्थिक उलाढाल होऊन अनेक कुटुंबांचा आर्थिकस्तर उंचावण्यात मदत झाली आहे. आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही शेतीतून आर्थिक उन्नती करत असल्याने तालुक्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

         प्रगतशील शेतकरी केशव बोडके म्हणाले, की देशी गोवंश सांभाळून त्यांच्या मल मुत्रापासून स्लरी तयार करून पिकांना सोडण्यात येते. बॅक्टेरीया, M गांडूळ खताची निर्मिती करून पिकांना सोडून सेंद्रिय विषमुक्त शेतीचा प्रयोग हा अनेक वर्षांपासून राबवत आहे. शासनाने माझा प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान केल्यामुळे शेतामध्ये अधिक जोमाने काम करण्याचे प्रोत्साहन मला मिळाले आहे.