शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या मौजा काग स्मशानभूमीकडे ये-जा करणारा मार्ग नाही.याचबरोबर मृतदेह जाळण्यासाठी शेड नाही.या दोन्ही कामांकडे चिमूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रित व दोन्ही कामे निकाली काढण्यात यावी,या आशयाचे निवेदन रोखठोक प्रहार संघटनेचे चिमूर तालुका अध्यक्ष अशिद मेश्राम यांनी चिमूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे.
नगर परिषद चिमूर अंतर्गत काग येथे स्मशानभूमीचे शेड व स्मशानभूमीकडे ये-जा करण्याकरिता रस्ता उपलब्ध नसल्याने काग येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्मशानभूमीकडे ये-जा करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.
तर कधी काग येथील एखादी व्यक्ती मृत्यू पावला किंवा मृतमुखी पडला तर त्या व्यक्तीला अग्नी देण्यासाठी किंवा अंत्यविधीसाठी स्मशानभूमीचे शेड उपलब्ध नसल्याने,उमा नदी पात्रात मृत्यू मुखी पडलेल्या व्यक्तीला अग्नी देऊन त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करावा लागतो आहे.
पावसाळ्यामध्ये नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली तर एकंदरीत नागरिकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून मोठ्या अडचर्णीचा सामना करावा लागत,असल्याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
दि, २५/०९/२०२३ रोजी,न.प. चिमूर कार्यालयाला पत्र देण्यात आले होते.परंतु निधी उपलब्ध नसल्याने हे काम प्रलंबित राहिले.
काग येथील नागरिकांना चिखलाच्या साम्राज्यातून स्मशानभूमीकडे जसं रस्त्याने जाता येईल.त्या पद्धतीने नागरिकांना वाटचाल करावी लागत आहे.यानंतर दि, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी. प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन काग येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात व प्रभागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यावा या संदर्भात प्रभागामध्ये ‘गनिमी कावा आंदोलन’ केले.
काग येथील सदर आंदोलन गेले १० ते १२ दिवस सुरू होते.आंदोलनाची नगर परिषद प्रशासन व स्थानिक आमदार यांनी सुद्धा दखल घेतली होती.
यानंतर सुध्दा प्रभागातील नागरिकांच्या काही मागण्या मार्गी लागल्यात तर काही मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.
मुख्याधिकारी चिमूर यांनी काग येथील स्मशानभूमीकडे ये-जा करणाऱ्या रस्त्याचे व स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यासाठी संवेदनशील कर्तव्य पार पाडावे अशी अपेक्षा अशिद मेश्राम सह गावकऱ्यांची आहे.
अन्यथा काग येथील नागरिकांना सोबत घेऊन आत्मदहन आंदोलन करू असा इशारा रोखठोक प्रहार कामगार संघटना चिमूर तालुका अध्यक्ष अशिद मेश्राम यांनी निवेदनातून चिमूर मुख्याधिकारी यांना दिला आहे.



