वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने पंडित कल्याणजी गायकवाड यांचा सत्कार…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : संतभुमी अलंकापुरीतील वारकरी संप्रदायातील साधकांचे विद्यापीठ असलेले सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणार मानाचा संगीत क्षेत्रातील कंठ संगीतरत्न पुरस्काराने नुकतेच वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना देऊन गौरविण्यात आले त्यानिमित्ताने त्यांचा यावेळी संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव बाजीराव नाना चंदीले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हभप तुकाराम महाराज मुळीक,हरिदास महाराज हरीचंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कल्याणजी गायकवाड म्हणाले की महाराष्ट्र शासनाचा कंठ संगीत पुरस्कार मिळाल्याबद्दल जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार झाला त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार झाल्याची भावना मनात आली आणि कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. कारण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आपली आई त्यामुळे आईची कौतुकाची थाप मिळाल्या सारखेच वाटले.