शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथील मेन रोडनी गांगलवाडी व ब्रम्हपुरी कडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी माठातील थंड पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते कृपाकर चहांदे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मित्र परीवार यांच्या पुढाकारातून पाणपोई सुरू केली आहे. याचे नुकतेच उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते विनोद झोडगे यांच्या हस्ते पार पडले.
सध्या मार्च महिना सुरू आहे मात्र एप्रिल मे महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. त्यामुळे पाणी हा मानवी जीवनाला नव संजीवनी देणारा जलस्त्रोत असून पाणी जीवनावश्यक आहे.
प्रत्येक नागरिकांना तसेच ये-जा करणाऱ्या वाटसरूंना वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. चौगान हे ब्रह्मपुरी तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असून मोठी लोकवस्ती असलेले गाव आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लग्नसराई मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा पाण्याची गरज भासणार आहे. सोबतच मुख्य चौकाच्या ठिकाणी मोठी नागरिकांची सदैव वर्दळ असल्यामुळे पाण्याची नितांत गरज भासते. वेळेवर कोणालाही पाण्याची अडचण जाऊ नये म्हणून पाणीपोई सुरू केली आहे.त्याच्यातच आपल्याला सात्विक समाधान असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते कृपाकर चहांदे यांनी व्यक्त केले.
यावेळी विनोद झोडगे, शीला चहांदे, तानाबाई मेश्राम, कालिंदा चहांदे, भाग्यश्री भांगरे, कुंदा पत्रे, सुमित आठोडे, राजेश येवले ग्रामसेवक, अक्षय तिडके, डॉ अमन पंडेल, रोशन उरकु, गोवर्धन दोनाडकर, आसाराम मैंद, लालाजी मैंद यांच्यासह अन्य नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.



