उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
अवैध वाळू उपसा प्रकरणातंर्गत पत्रकारांनी खंडणी मागणीचा आरोप श्री.प्रथम संजय बाळबुधे रा.चिमूर,वय २३ वर्ष यांनी केला आहे.याचबरोबर त्यांनी चिमूर पोलिस ठाण्यात खंडणीबाबत तक्रार दाखल केली असल्याने पाच पत्रकारांवर भांदवी कलम ३०८(२),१२६ (२), ३(५), अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र,श्री.प्रथम संजय बाळबुधे हे २३ मार्च २०२६,रोजी रात्रोला अवैध वाळू उपसा करीत असल्याचे लोकेशन पत्रकारांजवळ असल्याने,श्री.प्रथम संजय बाळबुधे यांच्यावर सुध्दा वाळू चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचे ट्रक्टर जप्त करण्यात यावे अशी मागणी पत्रकारांची आहे.

चिमूर तालुक्यातील पत्रकारांचे विरोधात काही लोक असल्याने ते पत्रकारांना मानसिक त्रास देत आहेत.परंतु याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही की,पत्रकार हा सामाजीक कार्यकर्ता असतो,घडलेल्या घटना जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करतात.
अवैध धंदे वाल्यांना हे खपत नाही,नुकतेच येथे काही पत्रकारावर खोटारडेपणाने आरोप करून तक्रार केली असल्याने पत्रकार दहशतीखाली आले आहेत.वाळुची अवैध विक्री कशी काय केली जाते.सरकारच्या महसूलाची नुकसान होते ह्यातच पत्रकारांना त्रास देण्याबाबत जाणून बुजून प्रयत्न केला जात आहे.

उसेगाव परिसरातील उमा नदी मधील वाळूचा उपसा रात्रोला केला जातो,हा रात्रोच्या प्रहरी वाळूचा उपसा करणारा व्यक्ती कोणाच्या आशीर्वादाने करतो हे कळायला मार्ग नाही.पत्रकाराने विचारणा केली असता खोटारडेपणाने तक्रार केली जाते.
ट्रॅक्टरने भरणा करून वाळू विकणारा मुजोरी कोणाच्या भरोशावर करतो हे कळायला मार्ग नाही.पत्रकाराने देखील अशांच्या विरोधात संबंधित कार्यालयात तक्रार नोंद केली पाहिजे असे वर्तवले जात आहे.
वाळू चोरण्याचा धंदा दिवसा न करता रात्रोला केला जात जातो हे वास्तव असेल तर पत्रकाराने सत्यसमोर आणले पाहिजे.पत्रकारांना धमकी दिली जाते,वृत्तपत्राला जाहिरातीची मागणी केली तर अपमान केला जातो,खंडणीचे खोटारडे आरोप लावून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात.

त्यामुळे पत्रकार दहशतीखाली आले आहेत.प्रशासनातील संबंधित वरीष्ठांनी योग्य चौकशी करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.
बनावट तक्रार देवून चिमूर तालुक्यातील पाच पञकारांना खंडणीच्या आरोपाखाली फसवीण्याचा कट रेती तस्करांनी केला आहे.त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आहेत असे जीतेंद्र गाडगे,संजय नागदेवते,शार्दूल पचारे,वीलास मोहीनकर,शुभम रनदिवे या पञकारांना वीचारलेल्या प्रश्नाना त्यांनी उत्तर दीले.



