नव मतदारांचा कौल भाजपाच्या बाजूने – राजवर्धन पाटील..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

 

— मतदान नोंदणी प्रक्रियेत सक्रीय सहभागाचे राजवर्धन पाटील यांचे युवकांना आवाहन..

  — 25 जानेवारी मतदान जनजागृती दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे विविध ठिकाणी उपक्रम..

       25 जानेवारी नव मतदार जनजागृती दिनानिमित्तमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे नमो नवमतदाता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

        यावेळी बोलताना भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी युवकांशी संवाद साधताना युवकांचा कौल भाजपाच्या बाजूने असल्याचे सांगत आपल्या देशातील बलाढ्य लोकशाहीच्या प्रक्रियेत युवकांनी सहभागी होण्यासाठी मतदान नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

     देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युवकांशी मतदान नोंदणीसाठी संवाद साधला.राष्ट्रीय मतदान दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.भारताची विकसित राष्ट्रांकडे वाटचाल सुरू आहे.भारत सर्वोच्च पातळीवर यासाठी प्रयत्नशील आहे.नव मतदारांनी मतदान नोंदणी करून या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.

        नमो नवमतदाता संमेलनच्या अनुषंगाने भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव मतदारांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज संवाद साधला. 

        इंदापूर तालुक्यामधील चार ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

        जवळपास 2700+ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.

        यावेळी भाजपचे पदाधिकारी,माजी नगरसेवक शेखर पाटील ,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादा पिसे,भाजप युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी संदीप धनवडे,भाजप व्यापार आघाडीचे प्रतिनिधी सागर गानबोटे,मयूर शिंदे,अजित गायकवाड उपस्थित होते.