गट ग्रामपंचायत पालासावळी तील कालभैरवपेठ येथील मंदिर परिसरात समाजभवनचे भुमीपुजन राजु कुसुंबे (शिक्षण व वित्त सभापती जिल्हा परिषद नागपूर )यांच्या शुभहस्ते.

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

पारशिवनी::- श्री.राजु कुसुंबे शिक्षण व वित्त सभापती जिल्हा परिषद नागपूर यांच्या शुभहस्ते गट ग्रामपंचायत पालासावळी अंतर्गत कालभैरव पेठ येथील मंदिर परिसरात समाज भवन बांधकामचे भूमिपूजन करण्यात आले.

       या प्रसंगी पालासावली गावातील सरपंच सौ.सरिता राजेंद्र ठाकूर,उपसरपंच निखिल गंगाधर ढोंगे,सदस्य नीलिमा सुधीर वानखेडे,सदस्य रेश्मा विजय राऊत,सदस्य मनोज फुलचंद राऊत,सदस्य दीपक हरिचंद्र दुनेदार,सदस्य प्रतिभा राम कृष्ण चक्कबैस,सदस्य वैशाली गुणवंता मैद,सदस्य प्रतिभा चंद्रभान तुपट, सदस्य आशिष उरकुडा धोटे,तसेच निंबा ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप जी दियेवार,माजी सरपंच राजेंद्र ठाकूर,रमेशजी सहारे,शालिकजी ढोंगे,रामभाऊजी कोरडे, विनायकजी ढोंगे,माणिकजी राऊत,संपतजी कोरडे,रामकृष्ण चकबैस कालभैरव,पंचकमिटीचे संपूर्ण सदस्य व गावातील मान्यवर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.